बौध्दजन पंचायत समीती खरवली विभागाच्या वतीने वर्षावास धम्मप्रवचन मालिकेतील पाचव्या पुष्पाचे आयोजन

माणगाव (उत्तम तांबे) :- माणगांव तालुका बौध्दजन पंचायत समीती शाखेच्या अंतर्गत बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.५ खरवली विभाग यांच्या अंतर्गत रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी दु.१२ वाजता वर्षावास धम्म प्रवचन मालिकाचे पाचवे पुष्प यांचे आयोजन हे खरवली बुध्द विहारामध्ये केले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांना अभिप्रेत असलेला धम्म उपदेश हा विषय धम्म उपदेशक, धम्म प्रवचनकार आयु. रूपेश गमरे यांनी उपस्थित धम्म प्रवचनास बसलेल्या उपासक उपासिकेना मंगलमैत्री प्रबोधन केले. यावेळी प्रथम तथागत भगवान गौतम बुध्द,  छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून 'त्रिशरण, पंचशिला मंगलवाणीतुन घेण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित मान्यवर उपासक - उपासिकेंना शाल, पुष्पगुच्छ देऊन खरवली शाखेच्या वतीने सन्मानीत करण्यात आले. 

सदर वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माणगांव तालुका बौध्दजन पंचायत समितीचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र मोरे हे होते . तसेच चिटणीस आर. डी. साळवी, उप चिटणीस रंजित मोहिते, खजिनदार सुरेंद्र जाधव, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. नरेश जाधव, बौ. पं. स. माजी तालुका अध्यक्ष उत्तम तांबे, बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. ५ खरवली विभाग अध्यक्ष विवेक जाधव, उपाध्यक्ष राजेश कासारे, चिटणीस अमोल मोहिते, उपचिटणीस  नंदू कांबळे, खजिनदार  रोहित सकपाळ, ऑडीटर संतोष मोरे, संदेश वाहक संदेश कासारे, बौ. प. स. माजी ता. चिटणीस पराग जाधव, पत्रकार गौतम जाधव, विश्वास गायकवाड, शाखा क्र. १ चिटणिस विनोद मोरे, सुनिल उभारे, राकेश मोरे, अरविंद मोरे, संदेश साळवी, एकनाथ गायकवाड, नारायण जाधव, सुनिल उभारे, जयवंत जाधव, सुरेश कासारे, जनार्दन गायकवाड, तसेच खरवली विभाग बौध्दजन सेवा संघ खरवली ग्रामस्थ व मुंबई, संघर्ष महिला मंडळ खरवली, उपासक उपासिका यावेळी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.



Popular posts from this blog