रोहा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

३० जणांना मिळाली नवी दृष्टी

रोहा (प्रतिनिधी) :- रोहा येथे आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात सोमवारी १०५ नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी  आर. झुनझुनवाला, शंकरा आय हॉस्पिटलमध्ये ३० रुग्णांची शस्त्रक्रिया पार पडली. रोहा सिटिझन फोरमच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षभरात १५५० नेत्र रुग्णांना नवी दृष्टी मिळाली आहे.

ग्रामदैवत श्री धावीर मंदिराच्या भक्त निवासात शिबिर संपन्न झाले. शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप देखील करण्यात आले. शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील आणि डॉक्टर, तसेच सहकाऱ्यांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली. 

रोहा सिटिझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक अप्पा देशमुख, महेश सरदार, संदीप सरफळे, श्रीकांत ओक, संतोष खटावकर, दिनेश जाधव, दिनेश मोहिते, उस्मान रोहेकर, अहमद दर्जी, राजेश काफरे, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, निलेश शिर्के, परशुराम चव्हाण, समिधा अष्टिवकर, रिद्धी बोथरे, बिलाल मोरबेकर आदींनी परिश्रम घेतले. डॉक्टर्स डे निमित्ताने ट्रस्टच्या वतीने डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog