रतीश मगर, केशव खरीवले आदर्श शेतकरी

कृतीशील, प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा रोहा प्रेस क्लबच्या वतीने सन्मान

रोहा (प्रतिनिधी) :- जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृतिशील, प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन केला जातो. या अनुषंगाने रोहा तालुक्यातील रतीश मगर (रा. घोसाळे) आणि केशव खरिवले (रा. सांगडे) यांना रोहा प्रेस क्लबच्या वतीने रविवारी त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन गौरविण्यात आले. रोहा प्रेस क्लबने कृतिशील शेतकऱ्यांविषयी राबवलेल्या उपक्रमाबद्दल तालुक्यातील शेतकरी संघटना, कृषी विभाग व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधान व्यक्त केले, तर "हा पुरस्कार शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संधी यांना प्रोत्साहन देणारा आहे" अशी भावना आदर्श शेतकरी सन्मान प्राप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

सन्मान सोहळ्याला रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी कांबळे आण्णा, प्रियांका कांबळे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, कृषी अधिकारी प्रकाश राक्षीकर, राजेंद्र जाधव, ग्रामस्थ खेळू ढमाळ, सरपंच मारुती तुपकर, सदस्या सौ शेळके, पोलीस अधिकारी सुनील शिरसाट, शरद कोटकर, गणेश ढेरे, युवा कार्यकर्ते महेश तुपकर, प्रेस क्लबचे नरेश कुशवाह, श्याम लोखंडे, नंदकुमार मरवडे, शरद जाधव, जितेंद्र जाधव, संदीप सरफळे, महेश बामुगडे, अंजुम शेटे, समिधा अष्टीवकर, नंदकुमार बामुगडे, संतोष सातपुते व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts from this blog