कारखान्याच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू


रोहा, दि. १५ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील ट्रांसवल्ड फर्टीकेम प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी चार च्या सुमारास घडली. संकेत पाटील (वय २६ रा. आंबेघर, नागोठणे) असे या कामगाराचे नाव आहे.

रोहा येथील ट्रांसवल्ड फर्टीकेम प्रायव्हेट लिमिटेड या खते बनवणाऱ्या रासायनिक कारखान्याच्या छताचे पत्रे बदलण्याचे काम आज सुरू होते. यावेळी संकेत पत्रावर चढून उंचीवर काम करत होता. सेफ्टी बेल्टची दोरी तूटल्याने तोल जाऊन संकेत खाली कोसळला. तत्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Comments

Popular posts from this blog