ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

सुरुंग स्फोटात बालकाचा मृत्यू, एक गंभीर


रोहा, दि.१५ (प्रतिनिधी) :- ओहळातील कातळ फोडण्यासाठी लावलेल्या सुरुंग स्फोटात एका १० वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला तर एक ८ वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना रोहे तालुक्यातील सारसोली गावात घडली आहे. सुभाष रमेश पवार ( वय १० वर्षे ) असे मृत बालकाचे नाव असून आर्यन संजय जाधव ( वय ८ वर्षे ) गंभीर जखमी झाला आहे. 

सुभाष आणि आर्यन हे दोघे खंदार आदिवासीवाडी येथील रहिवाशी असून शुक्रवारी दुपारी २ वा. च्या सुमारास ते खेळण्यासाठी घटनास्थळी गेले होते. या ठिकाणी कातळ फोडण्यासाठी सुरुंग लावले असताना नागरिकांना सुरक्षितते विषयी कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. सुरक्षिततेविषयी खबरदारी न घेतल्याने  स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन्ही अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाले. यापैकी सुभाष पवार याला जबर मार बसल्याने तो जागीस मृत झाला तर आर्यन जाधव याला पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.          

या घटने नंतर मंगेश गणेश पवार ( रा. खंदार आदिवासीवाडी - चणेरा ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार जमीन मालक दत्ताराम कृष्णा चाळके व अन्य अज्ञात व्यक्तीविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक विनोद वायगणंकर करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog