रोह्यातील नालेसफाई अंतिम टप्प्यात


रोहा, दि १७ (प्रतिनिधी) :- पावसाळा तोंडावर येऊनही नालेसफाईला सुरवात झाली नसल्याने टीकास्त्र सुरू झाल्यावर, रोहा नगर पालिकेने मोठ्या नालेसफाईला सुरवात केली. शहरातील नाले सफाई आता अंतिम टप्प्यात आली असून नाल्यातून काढलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना मुख्याधिकारी पंकज भूसे यांनी दिल्या आहेत. 

पालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नालेसफाई केली जाते. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख नाले, गटारे यांची नालेसफाईची मोहीम शहरात राबविण्यात येते. शहरातील मोठ्या १० नाल्याची सफाई जेसीबी व पोखलन मशिनद्वारे कंत्राटी कामगार लावून केली जात आहे. तर शहर अंतर्गत नाल्याची सफाई पालिकेच्या कामगारांद्वारे करण्यात येत आहे.

सातमुशी नाला, मंगल वाडी ते पोस्ट ऑफिस मागील नाला, स्मशानभूमी समोरील नाला, कल्पक सोसायटी मागील मोठा नाला, जाधव नर्सिंगहोम मागील नाला, शेख सलाउद्दीन बाबा दर्गा समोरील नाला, पीडब्ल्यूडी ऑफिस बाजूचा नाला, फिरोज टॉकीज समोरील नाला, मुख्य बाजार पेठ मधील नाला, अष्टमी रेल्वेस्टेशन समोरील नाला इत्यादी जवळपास सर्वच नाल्यांची सफाई पूर्णत्वास आली आहे. पावसाने उसंत दिल्यामुळे शहरातील सर्वच ठिकाणी नालेसफाई झाल्याने पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.

Popular posts from this blog