आदिवासी समाजातील पहिली वकील ॲड. सपना वाघमारे हिच्या उच्च शिक्षणासाठी पालकमंत्री भरतशेठ गोगावले दांपत्याचा मदतीचा हात ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करत केला गुणगौरव महाडमध्ये कौतुक सोहळा संपन्न महाड-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- गरीबीची झळ आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची कास धरणाऱ्या खेडोपाड्यातील गुणवंत विद्यार्थिनी आज आपल्या कर्तृत्वाने यशाची नवनवीन शिखरे पार करत आहेत. अशाच एका खडतर संघर्षातून पुढे येत आदिवासी कातकरी समाजातील वाडीवर राहणाऱ्या ॲड. सपना वाघमारे या तरुणीने पुण्यामध्ये वकिलीची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून आता ती वकिलीतील पदव्युत्तर म्हणजेच 'एलएलएम' (LL.M.) चे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. समाजातील पहिली वकील ठरलेली सपना सातासमुद्रापार लंडन येथे शिक्षणासाठी जात असल्याची आनंदाची वार्ता समजताच, गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवत पुढील शिक्षणासाठी ५० हजार रुपय...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या शिक्षिका अमिता बामणे यांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर! रोठ खुर्द शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; कला-सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला यश महाडमध्ये होणार भव्य गौरव रोहा-रायगड, दि. ७ (प्रतिनिधी) :- विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण कृतीआधारित अध्यापनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या, तसेच नृत्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या रोहा तालुक्यातील रोठ खुर्द येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका अमिता गजानन बामणे यांना रायगड जिल्हा परिषदेचा यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण रोहा तालुक्यात शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले असून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिक्षिका अमिता बामणे यांनी आपल्या तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात विविध शाळांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच...

Comments
Post a Comment