नागोठण्याजवळील वाकण नाका येथे बर्निंग कारचा थरार

नागोठणे (प्रतिनिधी) :- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे जवळ वाकण येथे कारला आग लागल्याची घटना घडली आहे.

सायन मुंबई येथील खरात कुटुंबीय आपल्या स्विफ्ट डिझायर कार ने खोपोली, पाली मार्गे गणपतीपुले येथे फिरण्यासाठी जात होते. किशोर खरात, कांचन खरात, साक्षी खरात, गार्गी खरात, आणि कार चालक दत्तात्रेय पवार हे खरात कुटुंबातील पाच प्रवाशी पाली नागोठणे मार्गांवर वाकणनाका येथे थांबून हॉटेलमध्ये गेले असता रस्त्याच्या कडेला पार्किंग करून ठेवलेल्या त्यांच्या कारला अचानक आग लागली. कार मध्ये एक मुलगी बसली होती परंतु तिला वेळीच बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.
कार च्या समोरील बाजूस इंजिनला आग लागली असल्याचे रस्त्यावरील एका महिलेच्या लक्षात आले. खरात कुटुंबीयांना माहिती देताच त्यानी गाडीत बसलेल्या साक्षीला वेळीच बाहेर काढले आणि पाहता पाहता काही वेळातच संपूर्ण कारने पेट घेतला. तेथे असणारे स.पो.निरीक्षक एस. एस. खेडेकर, अमोल नलावडे यांनी तात्काळ आमडोसी येथील सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर कंपनीची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. सुप्रिम कंपनीचे अग्निशमन दल वेळीच पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. कारमध्ये सीएनजी गॅस होता. त्याचा स्फोट झाला असता तर प्रचंड नुकसान झाले असते. या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.


Comments

Popular posts from this blog