श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना श्री धावीर महाराजांच्या सशस्त्र पोलीस मानवंदनेची ऐतिहासिक परंपरा पुन्हा सुरू करण्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार आणि राज्यमंत्री बी. एल. पाटील यांचे योगदान मोलाचे! रोहेकरांच्या अस्मितेचा हा गौरवशाली वारसा जपणाऱ्या या दोन्ही महानुभावांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ऐतिहासिक बातमी अवश्य वाचा! देवस्थानचा १६५ वा नवरात्रोत्सव रोहा, दि. २२ ऑक्टो. (संदीप सरफळे) :- रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास शुक्रवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. यावेळी शासनाच्या वतीने रोहा पोलिस निरीक्षक अभय शेलार व पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात अलोट गर्दी झाली होती, यावेळी मंदिरात पालकमंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, नायब तहसीलदार राजेश थोरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकार...
ब्रेकिंग न्यूज




Comments
Post a Comment