पावसाच्या हजेरीत रोह्यात गोविंदांचा जल्लोष! शिस्तबद्ध मानवी मनोऱ्यांनी दहीहंड्या फोडत परंपरेचा सोहळा उत्साहात संपन्न जलधारांमध्ये बालगोपाळांची धूम रोहा-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारी रोहा शहरात जोरदार हजेरी लावताच अवघ्या वातावरणात चैतन्य संचारले आणि गोविंदांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले. कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, ढोल-ताशांचा गगनभेदी गजर आणि 'गोविंदा रे गोपाळा'च्या जयघोषाने अवघी रोहा नगरी दुमदुमून गेली होती. निसर्गाची साथ आणि तरुणाईचा अथांग उत्साह यांच्या मिलाफातून रोह्यात पारंपरिक गोकुळाष्टमीचा उत्सव अत्यंत दिमाखात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. दुपारनंतर शहरातील विविध आळ्यांमधून पारंपरिक वेशभूषेत सजलेली गोविंदा पथके रोहा बाजारपेठेकडे दाखल होऊ लागली, आणि पाहता पाहता मुख्य बाजारपेठेला जत्रेचे भव्य स्वरूप प्राप्त झाले. तालुक्यात यंदा जवळपास १२४ लहान-मोठ्या दहीहंड्यांचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. या सर्व आयोजनात बाजारपेठेतील समीर शेडगे यांनी उभारलेली भव्य दहीहंडी सर्वांचे विशेष आकर्षण ठरली. उंचच उंच ल...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
पहिल्या रायगड जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत ‘युनायटेड वुशू क्लब’चे निर्विवाद वर्चस्व २७ पदकांसह पटकावले विजेतेपद नवीन पनवेल, दि. ३० (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा वुशू असोसिएशनच्या वतीने नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सब-ज्युनिअर, ज्युनिअर व सीनियर रायगड जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ‘युनायटेड वुशू क्लब’च्या खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी नोंदवत स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर तब्बल १८ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य अशा एकूण २७ पदकांची लयलूट करत क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. यासोबतच ईशान कुंभार आणि तनिष्का मिश्रा या दोन सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनी आपल्या आक्रमक व तंत्रशुद्ध खेळाच्या बळावर स्पर्धेतील मानाचा ‘बेस्ट फायटर’ पुरस्कारही स्वतःच्या नावे केला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत ईशान कुंभार, साहिल कुलट, पार्थ निकम, रितेश गोवारी, प्रज्वल दरेकर, वरद कलांगे, श्री विरकर, ओम कोठावळे, ध्रुवांश हिरवे, प्रतिक सानप, आयुष नवले, इक्रा ता...




Comments
Post a Comment