सौरभ शिवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरसोली येथे नारळ फोडी स्पर्धेचे भव्य आयोजन अलिबाग-रायगड, दि. १३ (स्वप्निल नाईक) :- अलिबागचे माजी नगरसेवक संदीप शिवलकर यांचे सुपुत्र तथा शिवाज्ञा ट्रान्सपोर्टचे संचालक सौरभ शिवलकर (अलिबाग) यांच्या वाढदिवसानिमित्त नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून वरसोली येथे पारंपरिक नारळ फोडी स्पर्धेचे मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला अलिबाग शहरासह परिसरातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवकांसह विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेची रंगत अधिक वाढवली. नारळ फोडीच्या पारंपरिक खेळामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेदरम्यान सहभागी स्पर्धकांनी जोशपूर्ण खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नारळी पौर्णिमा हा कोकणातील सांस्कृतिक वारसा जपणारा महत्त्वाचा सण असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. सौरभ शिवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे पारंपरिक खेळांना चालन...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
नागोठण्याजवळ बोरावाडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न पारंपरिक वेशभूषा, तारपा नृत्य आणि भव्य रॅलीतून घडले संस्कृतीचे दर्शन शिहू-रायगड, दि. ९ (मंजुळा म्हात्रे) :- दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून अतिशय उत्साहात आणि आदराने साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महत्त्वपूर्ण ठरावानुसार जगभरातील आदिवासी समाजाचे हक्क, त्यांची आगळीवेगळी संस्कृती, परंपरा आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हा दिवस विशेष पाळला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर १९९४ मध्ये अधिकृत ठराव संमत करून ९ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन म्हणून जाहीर केला होता. तत्पूर्वी, ९ ऑगस्ट १९८२ रोजी जिनेव्हा येथे युनायटेड नेशन्सच्या मानवी हक्क आयोगाच्या स्वदेशी लोकसंख्याविषयक कार्यगटाची पहिली ऐतिहासिक बैठक पार पडली होती, ज्याची आठवण म्हणून हा दिन जगभरात ओळखला जातो. आदिवासी समुदायाच्या जमिनी, भाषा आणि मानवी हक्कांचे सक्षमपणे रक्षण करणे, त्यांच्या पारंपरिक कला, बोलीभाषा आणि जीवनशैलीचा सन्मान करणे, तसेच जल, जंगल आणि जमीन या निसर्गसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी आ...
धाटाव येथील 'बेक' कंपनीत कामगारांना भरघोस पगारवाढ कामगार नेते संजयजी वढावकर व संज्योत वढावकर यांचे कामगारांकडून जाहीर आभार ऐतिहासिक करारामुळे आनंदोत्सव! रोहा-रायगड, दि. १२ (किरण मोरे) :- धाटाव औद्योगिक क्षेत्रातील नामांकित 'बेक केमिकल प्रा. लि.' कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित वेतनवाढ व विविध मागण्यांवर अखेर यश संपादन झाले असून, जनरल मजदूर सभा ठाणेच्या यशस्वी मध्यस्थीमुळे कामगारांना ऐतिहासिक व भरघोस पगारवाढ मंजूर करण्यात आली आहे. कामगारांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ कामगार नेते, जनरल मजदूर सभा ठाण्याचे सरचिटणीस तथा हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजयजी वढावकर तसेच संज्योत वढावकर मॅडम यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि अभ्यासू वाटाघाटींमुळे हा महत्त्वपूर्ण वेतन करार यशस्वीरीत्या पार पडला आहे. या यशस्वी करारासाठी रोहा युनिट प्रमुख सुहास खरविले यांच्यासह कमिटीचे अध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष राजेश बामुगडे, सेक्रेटरी विजय जाधव, खजिनदार संदीप रटाटे आणि सहसेक्रेटरी सतीश चावरेकर यांनी मोलाचे योगदान दिले. कामगारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल बेक कंप...
'सेवा, संवेदनशीलता आणि नवोपक्रम'चा संकल्प रोहा लायन्स क्लबच्या ५३ व्या पदग्रहण सोहळ्यात मिलन शाह अध्यक्षपदी विराजमान रोहा-रायगड, दि. २७ (प्रतिनिधी) :- समाजसेवेची ५३ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या लायन्स क्लब ऑफ रोहाच्या ५३ व्या पदग्रहण सोहळ्याचा दिमाखदार उत्सव शुक्रवारी अक्षय लॉन्स, निवी रोड, रोहा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी लायन ॲड. मिलन शाह यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. समाजसेवेचा वारसा जपत "सेवा, संवेदनशीलता आणि नवोपक्रम" या ब्रीदवाक्यासह त्यांनी नव्या कार्यकाळाची दमदार सुरुवात केली. दानशूर व सेवाभावी स्वर्गीय हर्षदभाई शाह यांच्या समाजसेवेचा वारसा लाभलेले लायन ॲड. मिलन शाह यांनी यापूर्वी क्लबमध्ये सचिव, खजिनदार व उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून परोपकारी, धार्मिक व सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानामुळे ते परिसरात आदराचे स्थान निर्माण करून आहेत. यावेळी लायन संजय एकल यांनी सचिव, लायन माया कौशिक शाह यांनी कोषाध्यक्ष...




Comments
Post a Comment