धाटाव एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यात केमिकल कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट! राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर रोहा-रायगड, दि. १६ (किरण मोरे) :- रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) प्रदूषण आणि बेकायदेशीर कृत्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला असून, यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. सध्या या भागातून एक अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर येत आहे. धाटाव एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या नामांकित एक्सल कंपनीच्या अगदी समोर एक जुना कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेला आहे. याच बंद कारखान्याच्या आवाराचा आणि केप्रेस कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या जागेचा गैरफायदा काही समाजकंटकांकडून घेतला जात आहे. आसपासच्या कार्यरत कंपन्यांमधून निघणारा अत्यंत घातक आणि रासायनिक (केमिकल) कचरा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता किंवा नियमांचे पालन न करता या बंद कारखान्याच्या परिसरात बेकायदेशीरपणे आणून टाकला जात आहे. व्हिडीयो पहा केवळ हा रासायनिक कचरा ये...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
नागोठणे रिलायन्सच्या सेवानिवृत्त कामगारांचा निरोप समारंभ संपन्न भारतीय श्रमिक शक्तीसंघ कामगारांच्या पाठीशी ठाम - दिपकभाई रानवडे बेणसे-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियन ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठण्याच्या कामगारांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभी आहे. कोणत्याही कामगारावर अन्याय झाल्यास संघटना त्याला न्याय मिळवून देईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते, कामगार नेते तथा भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियनचे केंद्रीय कार्याध्यक्ष दिपकभाई रानवडे यांनी केले. नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजमधून सेवानिवृत्त होणाऱ्या कामगार व पदाधिकाऱ्यांच्या निरोप समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, कामगारांनी कंपनीचे नियम व 'स्टँडिंग ऑर्डर्स' आत्मसात करून आपले काम इमानेइतबारे करावे आणि स्वतःची सुरक्षितता अबाधित ठेवावी, असे आवाहनही शेवटी केले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून आगामी ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असलेले भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियनचे अध्यक्ष श्री. संजयभाई काकडे, सचिव श्री. सुधीरभाई पारंगे, वरिष्ठ पदाधिकारी श्री. अजिमभाई बेणसेकर तसेच भारतीय क...




Comments
Post a Comment