शिक्षण क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणारे शिक्षक घनश्याम म्हात्रे सेवानिवृत्त
सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
रोहा : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील धामणसई जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक घनशाम त्र्यंबक म्हात्रे हे आपल्या 38 वर्षांच्या शिक्षक सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा रायगड जिल्हा परिषद शाळा धामणसई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पिंगळसई केंद्रप्रमुख सन्माननीय साळी मॅडम, माजी उपसभापती पंचायत समिती रोहाचे चिंतामणी खांडेकर सरपंच नेहा ताई जंगम, डॉक्टर किरण पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शर्वरी कदम, उपसरपंच सुशील घाटवल, ओम श्री मेडिकलचे श्री समीर दपके, माजी सरपंच कोकरे, श्री काते, धवई सर, मोरे सर, र. य. पाटील सर, नागोटकर सर, खरीवले सर, सुटे सर, श्री शेळके सर सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग शिक्षक वृंद, मित्र, आप्त नातेवाईक उपस्थित होते.
घनश्याम म्हात्रे सरांचा जीवन प्रवास पाहिला तर त्यांचे मूळ जन्मगाव काळेश्री (पेण) हे असले तरी नोकरीचा सेवा काळ रोह्याच्या मातीत पूर्ण झाला. त्यामुळे रोह्यातच अनेक वर्ष वास्तव्य असल्याने त्यांची कर्मभूमी ही रोहाच ओळखली जाते. आपल्या शिक्षक नोकरीच्या काळात सानेगाव हायस्कूल, डोंगरी, खारापटी, धामणसई, अशा अनेक शाळेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहीले. कडक शिस्तीचे म्हात्रे सर यांनी अनेक विद्यार्थी घडविले. स्वतःला शिक्षण क्षेत्रात झोकून देऊन काम करत होते. 38 वर्षे सेवा करीत असताना प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना तन-मन धनाने शिकवले. मुलांचा पाया मजबुत असेल तर ते पुढे कमी पडणार नाहीत हा ध्यास घेत त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविले. रोहा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा विशेष नावलौकिक आहे. त्यांच्या निवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी अनेक शिक्षक वर्ग ग्रामपंचायत सदस्य माजी विद्यार्थी पालक वर्ग यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीच्या निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसूत्रसंचालन शिक्षक श्री जयेश भोईर यानी केले.