जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पेणच्या खेळाडूंचे घवघवीत यश! 'युनायटेड शोतोकान कराटे डो असोसिएशन'च्या विद्यार्थ्यांची पदकांवर मोहोर शालेय बॉक्सिंग मैदानात पेणचा दरारा पेण-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- शालेय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पेण तालुक्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. 'युनायटेड शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया'च्या पेण शाखेमध्ये शिहान विनायक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट तंत्र आणि कौशल्याचे प्रदर्शन करत तालुक्याच्या क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवला आहे. पिल्लई एचओसी स्कूल, रसायनी येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील (अंडर-१४) वयोगटातील ३० ते ३२ किलो वजनी गटामध्ये सार्वजनिक विद्यामंदिर पेणचा खेळाडू सुफियान मिन्हाज अन्सारी याने प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत मानाचे रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) पटकावले. तसेच १९ वर्षांखालील (अंडर-१९) वयोगटातील ७५ ते ८१ किलो या वजनदार गटात 'न्यू...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण-रायगड येथे कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन! नागरिकांची गैरसोय वाढली अलिबाग, दि. २२ (स्वप्निल नाईक) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पेण-रायगड येथील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले असून संपाचा कालावधी वाढत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचारी एकत्र येऊन शासनाकडे आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करत होते. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी एकजुटीचे प्रदर्शन करत विविध घोषणांद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, परवाने नूतनीकरण तसेच इतर महत्त्वाच्या कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक नागरिकांना आपली कामे प्रलंबित ठेवून परत जावे लागत असून वेळ आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. विशेषतः व्यावसायिक वाहनधारक,...


Comments
Post a Comment