कोलाड आंबेवाडी नाक्यावर मोबाईलची चोरी 

  २ लाख १९ हजारांचे मोबाईल लंपास!  

कोलाड : निलेश महाडीक

कोलाड आंबेवाडी नाक्यावर एका आज्ञात चोरट्याने दुकानदाराचे २ लाख १९ हजार ५०० रुपये किंमतीचे विविध प्रकारच्या कंपन्यांचे मोबाईल लंपास केले.

याबाबत कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार शिवा सुबिर करमोकर, रा. सेवादल आळी रोहा हे त्यांच्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील "न्यु टाईम सेंटर अँन्ड मोबाईल" या दुकानातून तीन पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशव्यांमध्ये ठेऊन त्या कापडी पिशव्या दुकानामधून बाहेर घेऊन येऊन दुकानाचे शटर लावून त्या पिशव्या दुकानाच्या व्हराड्यात ठेऊन गाडीचे लॉक उघडण्याकरिता गेले असताना त्यापैकी एक कापडी पिशवीतील १६ मोबाईल असा एकूण २,१९,५०० रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केला. पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ७६/२०२३, भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून कोलाड पोलीस निरिक्षक ए. एस. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार एन. डी. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Popular posts from this blog