रोहा मध्ये मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रोहा : किरण मोरे

रोहा तालुक्यातील नागरीकांमध्ये मतदाना बाबत जनजागृती व्हावी, मतदानापासून कोणीही वंचित राहू नये. 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदान नोंदनी करावी त्यांना योग्य असे मार्गदर्शन व्हावे यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भारत निवडणुक आयोगाव्दारे दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने, प्रविण पवार, मतदार नोंदणी अधिकारी 191 पेण, किशोर देशमुख सहा. मतदार नोंदणी अधिकारी 191 पेण यांच्या मार्गदर्शनाखाली व मेहेत्रे अप्पर तहसिलदार प्रभारी निवडणूक नायब तहसिलदार उज्वला अंधेरे रोहा, गट शिक्षण अधिकारी रोहा यांच्या उपस्थितीत रोहा शहरांतील ज्येष्ठ नागरिक सभागृहात मतदारांसाठी मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी वय वर्ष 18 पुर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अॅपव्दारे मतदार नोंदणीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व आपापल्या गावात नागरीकांना मतदान नोंदणीचे महत्व पटवून द्यावे असे आवहन यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी नागरीकांना केले आहे.

Popular posts from this blog