कोकण मराठी साहित्य परिषद रोहा च्या वतीने "पाऊस पाणी गप्पा गाणी" कार्यक्रमाचे आयोजन
रोहा : प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा यांच्या वतीने पाऊस पाणी गप्पा गाणी या कार्यक्रमाचे आयोजन श्रीयोग निवास भुवनेश्वर रोहा येथे शाखा अध्यक्षा संध्या विजय दिवकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतात्म्यांस श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. इये देशीचे दुर्ग पुस्तकाचे लेखक सुखद राणे व कवयित्री मानसी चापेकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाल्याने तसेच कोकण आयडॉल हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे श्री गणेश भगत व निसर्ग मित्र सन्मानपत्र या पुरस्काराने पुरस्कारीत झालेले शाखेचे सभासद पुंडलिक ताडकर इत्यादी सर्वांचा अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी पाऊस पाणी गप्पा गाणी या विषयावरील कवितांमध्ये सर्व जण चिंब भिजून गेले. पावसानेही हजेरी लावून आपली उपस्थिती दर्शविली. अजित पाशिलकर, पानवकर सर, आरती धारप,नेहल प्रधान, शरद कदम, विजय दिवकर, संध्या दिवकर यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या कविता सादर केल्या. आकाश रुमडे यांच्या इंग्रजी कवितेला विशेष दाद मिळाली. भरत चौधरी यांनी देवदत्त पटनाईक यांच्या इंग्रजी पुस्तकातील सारांश कथन केला. स्वराज दिवकर यांनी सुखद राणे लिखित इये देशीचे दुर्ग या पुस्तकातील इर्शाळगडाची माहितीचे वाचन केले.
गडकिल्ले अभ्यासक सुखद राणे यांनीसुद्धा इर्शाळगडाच्या सफरीच्या प्रत्यक्ष अनुभवाचे रोमहर्षक वर्णन केले. कवी संमेलनात रोहा मधील अनेक कवींनी सहभाग घेतला.