जागतिक मंदिर संमेलनात रायगड जिल्ह्यातील रोहा नगरीचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवस्थानचा सहभाग
रोहा : प्रतिनिधी
रोहा नगरीचे आराध्य, ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. पहाटे पोलीसांची सशस्त्र सलामी देऊन पालखी सोहळ्याला सुरवात होते. जागतिक मंदिर संमेलनात रायगड जिल्ह्यातील रोहा नगरीचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवस्थानचा सहभाग झाल्याने रोहे नगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदुस्थानात पहिल्यांदाच जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन देशातील काशी क्षेत्र वाराणसी येथे करण्यात आले. या मंदीर अधिवेशनात रोहा तालुक्यातील श्री धावीर महाराज देवस्थान विश्वस्थांनी आपला सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील पाच मंदिरांच्या विश्वस्थांचीही उपस्थिती होती.
हिंदुस्थानात उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे तीन दिवस घेण्यात आलेले जागतिक मंदिर अधिवेशनाचे आयोजन मुंबईतील अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. या संमेलनात हिंदुस्थानसह इतर ३५ देशातील मिळून १२०० हून अधिक मंदिर समिती सदस्य सहभागी झाले. या मंदिर अधीवेशनात रायगड जिल्ह्यातील रोहा नगरीचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवस्थान
श्री क्षेत्र हरिहरेश्वर, बल्लाळेश्वर मंदिर पाली, गणपती मंदिर महड, विरेश्वर मंदीर महाड, या देवस्थानांची उपस्थिती होती.
रोहामधून श्री धावीर महाराज देवस्थानचे विश्वस्त श्री मकरंद बालटक्के, श्री अमोल देशमुख हे उपस्थित होते. यावेळी श्री मकरंद बारटक्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले.