हेमंत शिरसे यांचे निधन जिवाला चटका लावून जाणारे, तामसोली गावावर शोककळा
कोलाड : निलेश महाडीक
रोहा तालुक्यातील तामसोली गावचे रहिवासी हेमंत सखाराम शिरसे यांचे शनिवार दि.२७ मे २०२३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ३९ वर्षे होते. त्यांचा स्वभाव परोपकारी व प्रेमळ होता. सामाजिक कार्यात ते नेहमीच सक्रिय होते. अन्यायाविरुद्ध नेहमीच पेटून उठणारा व जनतेला न्याय मिळवून देणारा अशी या तरुणाची ख्याती होती. त्यामुळे हेमंत शिरसे यांचे निधन जिवाला चटका लावुन जाणारे आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य नागरिक, समस्त तामसोली ग्रामस्थ उपस्थिती होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई, बहीण व मोठा शिरसे परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि.५ जून तर उत्तरकार्य विधी गुरुवार दि. ८ जून २०२३ रोजी त्यांच्या निवास्थानी होणार आहेत.