द. ग. तटकरे विद्यालय कोलाडचा एस.एस.सी. परिक्षेचा निकाल ९६ टक्के
कोलाड : निलेश महाडीक
रोहा तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटी कै. द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाडचा निकाल ९६.११ टक्के लागला आहे. या विद्यालयातील एकूण १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर फक्त ४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत प्रांजल महेश निळेकर ९६.४० टक्के मिळवून प्रथम, पार्थ अजय कापसे ९५.२० टक्के मिळवून द्वितीय, मितेश राकेश पुजारी ९४.४० टक्के मिळवून तृतीय, वैष्णवी चंद्रकांत महाबळे व दीक्षा संतोष सानप ८९.८० टक्के मिळवून चतुर्थ, तर अनुष्का नरेश जामकर ८९.६० टक्के गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विभागातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.