मा. आ. श्री विवेकानंद शंकर पाटील यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त रा.जि.प. शाळा कसारभाट येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
साई बौद्ध विकास मंडळाच्या उपोषणाला यश; अनाधिकृत बांधकाम तोडण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही माणगांव (उत्तम तांबे) :- माणगांव तालुक्यातील साई बौद्धवाडी येथील बौद्ध समाजाच्या मालकीच्या जागेत अनाधिकृत अंगणवाडी करता बांधकाम करण्यात आले होते. १८ जानेवारी २०२४ रोजी सदर अनाधिकृत बांधकामाला सुरुवात केली असता त्यावेळी तेथील ग्रामस्थ त्या ठिकाणी विचारपूस करिता गेले असता साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करून धमकावले होते या प्रकाराबाबत माणगाव पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी न्याय मागण्याकरिता तक्रार दाखल केली होती. तसेच याबाबत अंगणवाडी संबंधित कार्यालयाला तक्रार पत्र सादर केले होते. सदरची अंगणवाडी बांधण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने साई बौद्धवाडीतील ग्रामस्थांना विश्वासात न घेता, साई ग्रामपंचायत उपसरपंच यांनी बौद्ध समाजाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. ग्रामपंचायतच्या कोणताही ठराव नसताना सदर बांधकामाबाबत निविदा जाहीर न करता, जागेबाबत सहमती न घेता सदर ठेकेदारांनी अंगणवाडी बांधकाम सुरू केले होते. सदर अनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थ निवेदन ...