पाटणूस येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरवणू्कीमध्ये लेझीम डान्स करून महिलांनी डॉ. बाबासाहेबांना दिली अनोखी मानवदंना

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगांव तालुक्यातील पाटणूस येथे दोन दिवस (13 आणि 14 एप्रिल ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. 13 एप्रिल रोजी लहान मुले व महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून धमाल उडवून दिली. 14 एप्रिल रोजी ग्रामपंचायत पाटणूस कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

सायंकाळी 5 वा. संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या मिरवणुकीत रेकॉर्ड डान्स बरोबर पारंपारिक लेझीम प्रकार महिलांचे खास आकर्षण होते. मिरवणूक विसर्जित करून रात्री आठ वाजता बाबा साहेबांच्या जीवनावर अनेक वक्त्यांनी भाषणे करून भारतिय संविधाना बद्दल नागरिकांना माहिती दिली. या वेळी पंचशील बौद्ध मंडळ पाटणूसचे पदाधिकारी, पाटणूस ग्रामपंचायतीच्या सरपंच, सर्व सदस्य ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आम्रपाली महिला मंडळाच्या पदाधिकारी व महिला, ग्रामस्थ महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी(अध्यक्ष), पंचशील बौद्ध विकास मंडळ पाटणूस  नितिन मोरे, ( उपाध्यक्ष) अरुण नामदेव रोखे,(सचिव) सागर महेंद्र भालेराव, (सह सचिव )स्वप्नील चंद्रकांत मोरे, (कोषाध्यक्ष) चंद्रकांत मोरे, (सचिव) संकेत भरत गायकवाड यांनी तसेच आम्रपाली महिला बचत गट पाटणूस यांनी विशेष मेहनत घेतली.

Popular posts from this blog