बोर्ली दिघी रस्त्यावर मोटार सायकलचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
वडवली/श्रीवर्धन : संतोष मांजरेकर
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बोर्ली पंचतन मार्गावर २९ मार्च २०२३ रोजी ९च्या सुमारास वडवली गावच्या दरम्यान असलेल्या एसार पेट्रोल पंपासमोर वडवली गावातील रहिवासी आतिष महेश नाकती हे आपली होंडा कंपनीची मोटार सायकल क्र. एम एच ०६ बी आर ८९९८ घेउन वेळास वरुन वडवलीच्या दिशेने येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि.२९ मार्च २०२३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आतिष महेश नाकती (वय३०) रा. वडवली हे मोटरसायकल वरुन आणि इकबाल शरफुद्दीन गझगे (५५) रा. गोंडघर हे बोर्लिच्या दिशेने पायी चालत येताना त्यांना पेट्रोलपंपासमोर मोटार सायकलस्वार आतिष महेश नाकती यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक लागली ही धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल चा पुढच्या भगाचा चक्काचुर झाला. येथे प्राथमिका अरोग्य केन्द्रात् पाठविले परंतु उपचारापुर्वीच आतिष महेश नाकती हे मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर इक्बाल गझगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले, परंतु दुर्दैवाने काही अंतरावर वाटेतच गझगे यांनी आपले प्राण सोडले. यापेरकरणी पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी श्री. प्रसाद ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.