कुंडलिका प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये जागरूक पालक सुदृढ बालक अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील वरची वाडी विळे येथील कुंडलिका प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये जागरूक पालक सुदृढ बालक अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध आजारांमुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह बालकांच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वैद्यकीय अधिकारी ऋषिकेश केलासकर, आरोग्य सेविका ज्योती जाधव, आशा सेविका पद्मा सुतार यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. स्कूल मधील सर्वच विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापिका -वृषाली वांजळे, (आयरे )उप मुख्याध्यापिका -भाग्यश्री सुतार (कोळंबेकर), शशिक्षिका पलक कळमकर, अपर्णा बांदल, अश्विनी कदम, मदतनीस जयश्री म्हाप्रळकर उपस्थित होते.
या स्कूलमध्ये गुरु पौर्णिमा, आषाढी एकादशी, थोर नेत्यांची जयंती, ग्रँड पॅरेंट्स डे, शिक्षक दिन, शैक्षणिक सहल, विविध खेळाच्या स्पर्धा, विविध ऍक्टिव्हिटीस, वार्षिक स्नेहसंमेलन, व ख्रिसमस यांसारखे अनेक कार्यक्रम वर्षभर राबविले जातात.