काशिद येथून १० लाखांची स्पीड बोट चोरी प्रकरण, ४ महिने उलटूनही तपास नाही!

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड तालुक्यातील काशिद येथून १० लाख ५० हजार रूपयांची स्पीड बोट चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला असून याप्रकरणी ४ महिने उलटून देखील सदर चोरीचा तपास लागलेला नाही. 

मुरूड तालुक्यातील काशिद येथे हॉटेल व बोटींगचा व्यवसाय करणारे सनेश्वर प्रकाश कासार यांनी मुरूड पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी बोटींग करिता जॉर्ज मैजो इंडस्ट्रिज प्रा. लि. रेवस-अलिबाग यांच्याकडुन एक यामाहा कंपनीची मोटार मॉडेल मॉडेल नं VX 700 जेटस्की बोट तिचा इंजिन न 6 DU 1004740 अरु CARTON NUMBER JP YAMM 0018 J314 असा आहे. सदर जेटस्की त्यांनी 10 लाख 50 हजारांत खरेदी केली आहे. सदर जेटस्की रजिस्टर करुन तिचे नाव योगेश्वरी असे ठेवले आहे. तिचा रजिस्टर नं. RIP-IV 00 असा आहे. सदरची जेटस्की कुणीतरी अज्ञात चोरट्याने आजूबाजूला कुणीही नसल्याचा फायदा घेऊन बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून वरील वर्णनाची जेटस्की चोरून नेली. 

याप्रकरणी 14 ऑगस्ट रोजी मुरूड पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम 379, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु त्यानंतर चार महिने उलटले पण अद्यापही सदरच्या चोरीचा तपास लागलेला नाही. या जेटस्की प्रकरणी कुणालाही काहीही सुगावा लागल्यास  8767291288,  7744015119 येथे संपर्क साधून कळवाले, माहिती देणाऱ्यास योग्य बक्षिस दिले जाईल.

Popular posts from this blog