पिंगळसई येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू

रोहा : प्रतिनिधी 

रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे बुधवार दि. ७ डिसेंबर ते रविवार दि. ११ डिसेंबर पर्यंत श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरू आहे. 

स्वानंद सुखनिवासी गुरूवर्य अलिबागकर बाबा, गोपाळबाबा वाजे, धोंडूबाबा कोल्हटकर यांच्या कृपाछत्राखाली, ह.भ.प. गुरूवर्य पुरूषोत्तम महाराज पाटील व ह.भ.प. गुरूवर्य सखाराम महाराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंगळसई येथे श्री दत्त जयंती सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी  त्यामध्ये ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज पाटील - धाटाव यांचे किर्तन, गुरूवार दि. ८ डिसेंबर रोजी ह.भ.प. भारतीताई गाडेकर (वैजापूर - औरंगाबाद) यांचे किर्तन, शुक्रवार दि. ९ डिसेंबर रोजी ह.भ.प. डॉ. प्रविण दुशिंग पाटील (वैजापूर) यांचे किर्तन, शनिवार दि. १० डिसेंबर रोजी ह.भ.प. चैतन्य महाराज राऊत (बालकिर्तनकार - बीड) यांचे किर्तन, रविवार दि. ११ डिसेंबर रोजी ह.भ.प. अनिल महाराज तुपे (नाशिक) यांचे किर्तन, हरिपाठ यांसारखे विविध कार्यक्रम सुरू आहेत. 

हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष चंद्रकांत दहिमेकर, उपाध्यक्ष सुयोग खेरटकर, सेक्रेटरी संतोष मुटके, अतुल खेरटकर, विनय शिंदे, महेश खेरटकर, सुरज मुटके, मिलींद मोहिते, अजित जाधव, चंद्रकांत मोहिते, सुनिल पवार, आयुती डेकोरेटर्स - पिंगळसई, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ पिंगळसई (दत्त आळी) जाणता राजा मित्रमंडळ पिंगळसई (दत्त आळी) यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts from this blog