निराधार मुलांसोबत साजरा केला लग्नाचा वाढदिवस

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

वाढदिवस आणि तोही लग्नाचा असेल तर शक्यतो नातेवाईकांसोबत साजरा केला जातो. पण निजामपूर येथील कै. मोहनभाई धनजी मोदी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप मोहन मोदी यांनी आपला वाढदिवस थोडे वेगळ्या पध्दतीने साजरे करण्याचे ठरवले. आपल्या नातेवाईकांमध्ये दिखाऊपणा करून  अवाजवी खर्च करून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा निराधार मुलांसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर असा वेगळा विचार त्यांच्या मनात आला व तो त्यांनी आपल्या पत्नीला (लीना यांना) बोलून दाखविला. त्यांनाही तो पसंत पडला व त्या प्रमाणे कडापे येथील जिनियस मैत्रिकुल निराधार मुलांच्या सौस्थें मध्ये  जाऊन तेथील मुलांच्या सोबत आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.दोघा पती पत्नीने मुलांना खाऊ वाटप करून स्वतःच्या आनंदात सहभागी करून घेतले शिवाय 2100 रु. ची आर्थिक मदत सुध्दा केली.

अशा प्रकारे कौटुंबिक कार्यक्रम निराधार मुलांच्या सहवासात साजरा करून मोदी पती पत्नीने वेगळा आदर्श निर्माण केल्याने सर्व समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog