पाटणूस भिरा रस्त्याचा झाला धुरळा, डांबर पूर्ण निघून गेली 

वाहने चालवणे झाले अवघड

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगाव तालुक्यातील पाटणूस भिरा रस्ता अतिशय महत्वाचा रस्ता पण या रस्त्यावरची डांबर पूर्ण निघून गेली असून आता या रस्त्यावर उरली ती फक्त खडी आणि माती! हा रस्ता जिल्हा परिषद च्या अखत्यारीत येत असून गेली अनेक वर्ष जिल्हा परिषद प्रशासनाकडून या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. 

2009 साली सुध्दा या रस्त्याची अशीच बिकट अवस्था झाली होती; परंतु टाटा पॉवर भिरा कंपनीने या रस्त्याचे डांबरीकरण करून ती वेळ निभाऊन नेली. त्यानंतर गेली दहा बारा वर्ष रस्ता सु स्थितीत होता परंतु देवकुंड पर्यटकांच्या वाहनांची वरदळ, टाटापॉवर कंपनीची अवजड वाहने व स्थानिकांची वाहने सातत्याने या रस्त्यावरुन सतत  धावत असतात शिवाय या परिसरात पडणारा धो धो पाऊस यामुळे डांबरी रस्ता पूर्ण वाहून गेला असून आता रस्त्यावर फक्त खडी आणि माती उरली आहे. ग्रामपंचायत पाटणूस कडून सातत्याने पाठपुरावा करूनही जिल्हा  परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

दिवाळी नंतर या रस्त्याचे काम सुरू झाले तरच  रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण शक्य होईल अन्यथा पाटणूस भिरा रस्त्यावरून वाहनेच काय पायी चालणे सुध्दा अवघड होऊन बसेल. तरी ज़िल्हा परिषद प्रशासनाने त्वरित या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करावे अशी या परिसरातील नागरिकांची प्रमुख मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog