रोहा - कोलाड मार्गावर स्कूल व्हॅन आणि तीन आसनी व सहा आसनी रिक्षांमध्ये ओव्हरलोड प्रवासी आणि विद्यार्थ्यांची वाहतूक, आर.टी.ओ. कडे तक्रार दाखल

रोहा : किरण मोरे

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रोहा कोलाड मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या स्कूल व्हॅन आणि तीन आसनी व सहा आसनी रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा प्रकारे येथे वाहतुकीच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्यामुळे येथे स्कूल व्हॅनमध्ये अपघात होऊन लहान मुलांना गंभीर दुखापत होण्याचे प्रकार घडलेले आहेत. तसेच यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच या मार्गावरील अनेक मिनीडोअर रिक्षांचे फिटनेस आणि परमिट मुदतबाह्य झाल्याचे दिसून आलेले आहे. तसेच शाळेतील मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे विमा  (Insarance) हे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. आणि सदरची वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करुन धावताना दिसतात. गाडी पासिंग करते वेळी आर्थिक व्यवहार करून गाड्या पासिंग केल्या जातात पण भविष्यात अपघात झाल्यास विमा (insurance) बोगस असल्यामुळे कोणालाही नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच ही सर्व माहिती एका school van चालकाने नाव न सांगण्याचा आटीवर दिली आहे. तरी रिक्षा ( ३+१ ), मिनिडोर (६+१ ),  स्कूल व्हॅन यांचे विमा प्रमापत्र insurance खरा किंवा खोटा याची सत्यता पडताळणी करण्याबाबत पत्रकार, तथा  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रोहा तालुका अध्यक्ष किरण लक्ष्मण मोरे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.

Popular posts from this blog