पाटणूस येथून 40 वर्षीय इसम बेपत्ता
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील पाटणूस पंच क्रोशीतील फणशी दांड आदिवासी वाडीचा रहिवासी दाजी विठ्ठल जाधव हा 40 वर्षीय इसम कामानिमित्त बाहेर जातो असे सांगून गेला, परंतु एक महिना झाला तरी तो अद्यापही घरी परतला नाही. त्याची पत्नी पुणे येथे कामा निमित्त गेली आहे. तिच्याकडे चौकशी केली असता तो तिच्याकडे सुद्धा गेला नसल्याचे तिने सांगितले. तो मुका बहिरा असून त्याची नजर ही कमजोर आहे. त्याच्या डोळ्याला चष्मा आहे परंतु दारू प्यायल्या नंतर त्याला चष्म्याचा विसर पडतो.
उंची 5 फूट, सडपातळ बांधा, रंगाने सावळा, अंगात ऑफ व्हाईट फुल शर्ट, तपकिरी कलरची फुल पॅन्ट, आदिवासी, मराठी भाषा अवगत आहे. फक्त खाणा-खुणा करून संभाषण करतो. अशा वर्णनाचा इसम कुणालाही आढळल्यास कृपया माणगांव पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. माणगांव पोलीस ठाणे येथे त्याची बेपत्ता झाल्याची नोंद कारण्यात आली आहे.