सोनार सिद्ध धाटाव क्रिकेट स्पर्धेत वाघेश्वर रोठ खुर्द संघ प्रथम क्रमांकाने विजयी

रोहा : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील धाटाव येथे सोनार सिद्ध धाटाव क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक वाघेश्वर रोठ खुर्द, द्वितीय क्रमांक निवी, तृतीय क्रमांक आगरी ब्राईज रोठ खुर्द यांनी मिळविला. तसेच यामध्ये मालिकावीर अनिल मोरे, उत्कृष्ट गोलंदाज आशिष मोरे, उत्कृष्ट फलंदाज राणा मोरे अशी पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेतील सर्व विजयी संघांचे आणि उत्कृष्ट खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Popular posts from this blog