डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे श्री सदस्यांकडून वरचीवाडी विळे ते भागाड महामार्गाच्या दुतर्फा झाडे झूडपांची छाटणी व स्वच्छता
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगाव तालुक्यातील वरचीवाडी विळे बस स्थानक ते भागाड गावापर्यंत जाणाऱ्या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडे झुडूपे व गवत वाढले होते. त्यामुळे रस्ता आवळ होऊन वाहन चालकांना गाडी चालविणे धोक्याचे होऊन बसले होते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा तर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त रविवार दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी 135 श्री सदस्यांनी सहभाग घेऊन स्वच्छता केली. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढले. झाडे झुडूपे यांची छाटणी केली व रस्ता पूर्ण मोकळा केला. यावेळी सुका कचरा 5 टन व ओला कचरा अंदाजे दोन टन गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.