पिंगळसई येथे योगेश्वरी आई आणि चंडीका आईच्या नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

रोहा : प्रतिनिधी 

रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे नवसाला पावणारी तसेच पुरातन काळापासून जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या योगेश्वरी आई आणि चंडीका आई या देवस्थानांवर नवरातौत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येत आहे. 

पुरातन काळापासूनच येथे जागृत देवस्थान असून पिंगळसई येथील ग्रामस्थ मंडळ, देशमुख आळी, बौद्धवाडी आणि आदिवासीवाडी, दत्त आळी आणि पिंपळ आळी या सर्वांच्याच सहभागाने हा नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत असतो. येथे हरिपाठ, किर्तन, आरती यांसारखे विविध कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने साजरे होत असतात अशी माहिती येथील पुजारी फुलारे बंधू यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog