श्री. क्षेत्रपाल मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांच्यातर्फे पुई येथे "मंगळागौर" व "होम मिनिस्टर" कार्यक्रम संपन्न

कोलाड : निलेश महाडीक

रोहा तालुक्यातील पुई येथे श्री. क्षेत्रपाल मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ पुई यांच्या माध्यमातून नवरात्र महोत्सवानिमित्त दि. 4 ऑक्टोंबर 2022 रोजी मंगळागौर व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामधे प्रथम क्रमांक व पैठणीचा मान सौ. अरुणा अरुण राजीवडे यांनी पटकावले. तसेच द्वितीय क्रमांक सौ. प्रमिला प्रदीप सुटे यांना मिळालं आणि तृतीय क्रमांक सौ. जागृती शेखर जोशी हिला मिळाले. प्रश्नमंजुषा मधील बक्षीस कुमारी वैष्णवी उदय खामकर हिने पटकावले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निनाद शिंदे (रोहा) व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सागर विठोबा सानप तसेच मंडळाचे संस्थापक श्री. अनंत सानप,अध्यक्ष. श्री.विठ्ठल पवार, सचिव. श्री. हरिश्चंद्र कदम, श्री.सचिन लहाने तसेच उपसरपंच रोशनी राजेंद्र लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमात पुई गावातील सर्व महिला मंडळांनी मंगळागौर खेळले तसेच खास महिलांसाठी एक नवीन आकर्षक म्हणून "होम मिनिस्टर" हा अतिशय प्रसिद्ध कार्यक्रम घेण्यात आला. व प्रथम, द्वितीय, तृतीय असे विविध बक्षिसे देण्यात आली. तसेच लहान मुलांसाठी सुद्धा विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमात पुई गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री. अजित लहाने, समीर पडवळ, विठोबा सानप, चंद्रकांत फाटे, राम खामकर,दत्ताराम भणगे, मधुकर दिसले, गोपाल खामकर, किसन महाडिक,गोविंद खामकर, आत्माराम खामकर,लाईनमन वामन कदम,सचिन दिसले, नथुराम दिवेकर, ज्ञानेश्वर खामकर, अनिकेत शिर्के, केतन मोहिते, संदीप शिर्के, उल्हास कुचेकर, हेमंत महाडीक, निखिल कदम, मंगेश सानप, राहुल खामकर, लक्ष्मण पवार, सागर दिवेकर, प्रकाश पाटील, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. दिनकर सानप यांनी केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. क्षेत्रपाल मित्र मंडळ पुई व ग्रामस्थ मंडळ तसेच महिला मंडळ आणि लहान थोर पुरुष मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Popular posts from this blog