अेल्पे केमिकल्स कंपनीच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांना त्रास 

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल

रोहा : किरण मोरे

अेल्पे केमिकल्स प्रा. लि. ही कंपनी नियमांचे उल्लंघन करीत असून या कंपनीच्या व्यवस्थापनावर तातडीने कारवाई करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

शासनाने निर्गमित केलेले नियम धाब्यावर बसवून स्थानिक जनतेसाठी ही कंपनी त्रासदायक ठरू लागली असून प्रदूषणाच्या त्रासामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून नागरिकांचे जीवनमान धोक्यात आलेले आहे. अेल्पे केमिकल्स प्रा. लि. या कंपनीने नागरीकांना द्यावयाच्या सुविधा असतात त्या न देता उलट स्थानिक नागरिकांच्या जीवनाशी खेळ मांडला आहे. भर दिवसाढवळ्या प्रदुषित वायु सोडणे, नदीनाल्याद्वारे केमिकल युक्त प्रदुषित पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे. तसेच दिवसाढवळ्या हवेमध्ये प्रदूषण सोडण्याचा प्रकार येथे वारंवार दिसून आलेला आहे.

या कंपनीने प्रदुषणाबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केलेली दिसत नाहीत. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पहाणी करुन स्थानिकांवर होणाऱ्या त्रासाबद्दल तातडीने कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Popular posts from this blog