यशस्वीनी सामाजिक अभियान उमेद क्रांती प्रभाग संघ अभियानांतर्गत गावठण विळे येथे भोंडल्याचे आयोजन
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रौत्सव सुरू होतो. घरारात कुलदेवतांची घटस्थापना केली जाते. त्याचप्रमाणे अनेक मंदिरांमध्ये सुध्दा घटस्थापना केली जाते. दुर्गा देवीची स्थापना करून अनेक नवरात्रौत्सव मंडळे गरब्याचे आयोजन करतात. खरे तर हा गुजराती सण, पण हल्ली सर्वच ठिकाणी गरब्याचे लोण पसरले असून कोकणातील भोंडला काळाच्या ओघात मागे पडला. या भोंडल्याची माहिती सर्वांना म्हणजेच नविन पिडीला माहित असावी म्हणून यशस्वीनी सामाजिक अभियान उमेद क्रांती प्रभाग संघ अभियान अंतर्गत विळे गावठण येथे या भोंडल्याचे आयोजन केले होते.
फार पूर्वी मुलींची बाळपणातच लग्ने केली जात होती. सासरी गेल्यावर मुलींना प्रचंड कामे असायची. त्यांना कामातून विरंगुळा मिळावा म्हणून भोंडल्याचे आयोजन केले जायचे. भोंडल्याच्या निमित्ताने मुली माहेरी यायच्या व भोंडल्यात भाग घ्यायच्या.शिवाय या महिन्यात हस्त नक्षयात्राचा प्रारंभ होतो. म्हणून हत्तीची रांगोळी काढून त्याच्या भोवती फेर धरला जातो. हस्त नक्षत्रात पाऊस पडला तर भात पिकाला बहर आलेला असतो तरीही भाताचे दाणे वजनदार व्हावे म्हणून पाऊस पडणे गरजेचे असते म्हणून देखील भोंडला चे आयोजन असते अशी पूर्वी च्या शेतकऱ्यांची श्रद्धा होती.
या प्रथा अर्थातच नवीन पिढीला नक्कीच माहित नाही त्याचीही माहिती यनिमित्ताने पटवर्धन बाईंनी सर्वांना दिली शिवाय खेळाचे प्रकार महिलांना सांगितले महिलांनी सुध्दा खूप चांगले खेळ केले, फेर धरले, झिम्मा फुगडी व अनेक पारंपारिक खेळ महिलांनी केले. या भोंडल्या मध्ये शेकडो महिलांनी सहभाग नोंदवाला व भोंडला अतिशय खेळीमेळीत पार पडला.