सु.ए.सो.च्या धाटाव माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना आहार व आरोग्य विषयी डॉ. मिथिलेश पाळंदे यांचे मार्गदर्शन

कोलाड : सदानंद तांडेल

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या धाटाव माध्यमिक विद्यालयात नुकतेच विद्यार्थ्यांना आहार व आरोग्य विषयी डॉक्टर मिथिलेश पाळंदे (एम डी) यांचे मार्गदर्शन झाले. शालेय विद्यार्थ्यांच्या वाढीच्या वयात शरीराची वाढ व पोषण योग्य प्रकारे होण्यासाठी संतुलित आहार व व्यायाम आणि मैदानी खेळ यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना त्यांनी समजावून सांगितले. त्याबरोबरच बुद्धी आणि मनाचा विकास होण्यासाठी थोर व्यक्तींची पुस्तके वाचण्यास सुचवले. 

हा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक सुखदेव तिरमले यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन यशस्वी केला. धाटाव विद्यालय हे MIDC  परिसरात असल्याने येथे नेहमीच हवा ही प्रदूषित असते. त्याचा सर्वांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याचा विचार करून त्यांनी सर्व शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog