संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज हिताचे कार्य घडतात - चेअरमन विलास चौलकर
अष्टविनायक पतसंस्थेच्या 24 व्या सर्वसाधारण सभेत केले प्रतिपादन
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील इंद्रप्रस्थ हॉटेलच्या सभागृहात शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी झालेल्या श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेच्या 24 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी स्वताला भाग्यवान समजतो की, संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज हिताचे कार्य घडत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन विलास चौलकर यांनी केले.
या सभेत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा सत्कार झाल्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात पतसंस्थेचे चेअरमन विलास चौलकर यांनी कोरोना काळात सर्वत्र मंदीची लाट आली असतानाही आपल्या संस्थेने सर्वांच्या सहकार्यांनी चांगले कार्य केले. एकीचे बळ व संचालकांच्या एक जुटीमुळे संस्थेची प्रगतीकडे वाटचाल होत आहे. मी स्वताला भाग्यवान समजतो की,माझ्याकडून संस्थाच्या माध्यमातून अनेक समाज हिताचे कार्य घडत असून गरजवंताला मदतही करण्याची संधि मिळत आहे.आपल्या संस्थेला यावर्षीही शासकीय लेखा परीक्षणाकडून “अ” वर्ग मिळाला असल्याने समाधान वाटत आहे. हे संस्थेचे निवडणुकीचे वर्ष आहे संस्थेचा कारभार पारदर्शक व चांगल्या पध्दतीने चालले असून निवडणुकीचा खर्च संस्थेला येऊ नये व पुढील काळातही आपली संस्था आदर्श राहील यासाठी शक्यतो निवडणूक न घेता ती बिनविरोध कशी करता येईल यासाठी सर्वांनी समंजसपणे भूमिका घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन विलास चौलकर यांनी करून सर्व भागधारकांना 9% लाभांश देत असल्याचे शेवटी जाहीर केले.यावेळी राजन जगताप,दिनेश कोळी,शरद वाडेकर,महादेवसिंग परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला लेखा परीक्षक दिनेश कोळी, पोलिस निरीक्षक राजन जगताप,भाई टके,शिवराम शिंदे,संस्थेचे संस्थापक जयराम पवार,व्हा.चेअरमन महादेवसिंग परदेशी,सचिव आरती हातनोलकर, नामदेव चितळकर,चंद्रकांत गायकवाड,डॉ.अनिल गिते,यशवंत चित्रे,किशोर म्हात्रे,दिनेश घाग,राजेंद्र मोदी,निलोफर पानसरे,श्वेता चौलकर,नंदाताई गायकवाड यांच्यासह रोहिदास हातनोलकर,सुदाम घाग,अशोक भंडारे,संतोष चितळकर,प्रसाद जोगत,रवी वाजे,रतन हेंडे तसेच संस्थेचे सर्व संचालक,सभासद,कर्मचारी व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना रोहिदास हातनोलकर तर उपस्थितांचे आभार प्रसाद जोगत यांनी मानले.