हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन रोठ खुर्द, ता. रोहा येथे साखरचौथ गणेशोत्सव

रोहा : प्रतिनिधी 

रोहा तालुक्यातील रोठ खुर्द येथे साखरचौथ गणेशोत्सव सुरू असून हा गणेशोत्सव सलग १२ वर्षांपासून सुरू आहे. सलग दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू असून मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेत असतात. 

नवसाला पावणारा रोठ खुर्द चा राजा असलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येथे दरवर्षी असंख्य भाविकांची उपस्थिती असते. सर्व गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात येथे उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे. 

सर्व येणाऱ्या गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत! 

 - हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन आणि ग्रामस्थ मंडळ, रोठ खुर्द

Popular posts from this blog