को.म.सा.प.च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रवाळजे कॅम्प केंद्राचा प्रभाव

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान व मोठा गट मिळून तालुकास्तरावर 35 स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत मोठ्या गटात टाटा विद्यालय भिरा येथील विद्यार्थी श्रीराम होळंबे प्रथम क्रमांक तर लहान गटात रायगड जि.प.शाळा पाटणूस येथील विद्यार्थीनी ईश्वरी खटके हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करून या स्पर्धेवर रवाळजे कॅम्प केंद्राचे वर्चस्व सिद्ध केले. रवाळजे कॅम्प शाळेचा विद्यार्थी आहील मुलाणी याने स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी साहित्य परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख ओव्हाळ साहेब यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog