भाजप युवा नेते महेशदादा ठाकुर यांचा वाढदिवस उत्त्साहात साजरा
तरुणांची शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी
रोहा : प्रतिनिधी
भाजप युवा नेते महेशदादा ठाकुर यांचा वाढदिवस 21 सप्टेंबर ला उत्साहात साजरा झाला.
यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तरुणांची खूप गर्दी झाली होती. यावरूनच महेशदादा यांची रोहा तालुक्यातील तरुणांमध्ये एक क्रेज निर्माण झाली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
रोहा तालुक्यातील ज्येष्ठ कुणबी नेत्यांचा सत्कार, कोलाड विभागातील विविध मराठी शाळेत स्वच्छता डसबीन चे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, करोना काळातील आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य दुतांचा सत्कार, साहित्य वाटप असे विविध कार्यक्रम सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू होते व 6 नंतर रात्री 10 पर्यंत वाढदिवस कार्यक्रम चालू होता.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद घेतले. तसेच पनवेल चे आमदार प्रशांतदादा ठाकुर, पेण चे आमदार रवीशेठ पाटील साहेब, पेण विधानसभेचे संयोजक वैकुंठ पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष सोपानजी जांबेकर, ज्येष्ठ नेते विष्णु मोरे, तानाजी देशमुख, महादेव देवरे, शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे, बबलू सय्यद, संजय लोटनकर, रवींद्र तारू, तसेच रोहा भाजप पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच रोहा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतिचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, विविध गावातील मंडळाचे पदाधिकारी, डॉक्टर, वकील, शिक्षक, शिक्षिका, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, कब्बड्डी संघांचे खेळाडू, विविध पक्षाचे पदाधिकारी व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या. तरुणांच्या अलोट गर्दीमध्ये युवानेते महेशदादा ठाकुर यांचा वाढदिवस साजरा झाला.