ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रोहा तालुका कुणबी समाज तालुका कार्यकारणीची सभा अध्यक्ष शिवराम शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न

रोहा : समीर बामुगडे

कुणबी समाजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा तालुका स्तरावर चणेरा विभाग, धाटाव विभाग, कोलाड विभाग, ऐनघर विभाग, नागोठणे विभाग, सोनगाव विभाग कुणबी समाज ग्रुप जसे कार्यविहित झाले आहे. त्याचा आदर्श इतर विभागीय कुणबी समाज ग्रुपने घेतला पाहिजे याकरिता पुन्हा कुणबी समाज ग्रुपची पुनर्बांधणी करणार असल्याचे प्रतिपादन रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी केले. 

यावेळी उपस्थित समाज नेते रामचंद्र सकपाळ, रोहा उपाध्यक्ष मारुती खांडेकर सर, ओबीसी संघर्ष समिती व जनमोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, शंकरराव भगत, शिवराम महाबळे, दत्ताराम झोलगे सरचिटणीस, रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे,महेश ठाकूर,सुनिल ठाकूर,सुहास खरीवले, चणेरा ग्रुप अध्यक्ष नरेंद्र सकपाळ, धाटाव ग्रुप अध्यक्ष गुणाजी पोटफोडे, काशिनाथ भोईर, कोलाड ग्रुप अध्यक्ष संदेश लोखंडे, सोनगांव ग्रुप अध्यक्ष खेळु ढमाल, मेढा ग्रुप अध्यक्ष रामशेठ करंजे, ऐनघर ग्रुप अध्यक्ष यशवंत हळदे, सुतारवाडी ग्रुप  ह.भ.प.पडवळ महाराज, देविदास सानप, दगडु बामुगडे, सतोष देवळे, सतोष भोईर, शशिकांत कडू, शंकर कदम, महेश भगत, सुनिल मोहिते, महेश तुपकर, सुशिल खांडेकर सह तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कुणबी समाज बांधव व कार्यकरणी सभासद उपस्थित होते. 

तर ओबिसी रायगड जिल्हा अध्मक्ष कुणबी समाज नेते सुरेश मगर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, आपण आपल्या प्रत्येक गाव वाडीमध्ये कुणबी समाजाची किती घरे आहेत लोकसंख्या सह जनगणना केली पाहिजे. समाज बधंवाण यावर लक्ष देऊन नोंदणी करु करून घ्यावी असे आवाहन समाज बांधवांना यावेळी केले.

तर ज्येष्ठ समाज नेते शिवराम महाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुंबई संघावर जास्तीत जास्त अजिव सभासंदांची नोंदणी करा. तसेच कुळ कायदा विषयाप्रमाणे आपल्या तालुक्यातील तक्रारी दाखल करुन गोर गरीब शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजे असल्याचे सांगितले.

युवा नेते महेश ठाकुर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी ज्येष्ठ तालुका कमिटीचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कुणबी समाजातील आजच्या परिस्थिती वर ज्येष्ठ नेते शंकरराव भगत, दत्ताराम झोलगे, अंनत थिटे, युवा नेते महेश ठाकुर, सुनिल ठाकुर यांनी देखील समाजाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog