युवा नेते महेशदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहा तालुका कुणबी ज्येष्ठ नेत्यांचा जाहीर सत्कार
रोहा : समीर बामुगडे
कुणबी समजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा तालुका यांची विशेष कार्यकारणी सभा रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवराम शिंदे यांच्या अध्यक्ष ते खाली आयोजित केली होती. यावेळी उपस्थित समाज नेते रामचंद्र सकपाळ, रोहा उपाध्यक्ष मारुती खांडेकर सर ओबीसी संघर्ष समिती व जनमोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, शंकरराव भगत, शिवराम महाबळे, दत्ताराम झोलगे सरचिटणीस, रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे, महेश ठाकूर, सुनिल ठाकूर, सुहास खरीवले, चणेरा ग्रुप अध्यक्ष नरेद्र सकपाळ, धाटाव ग्रुप अध्यक्ष गुणाजी पोटफोडे, काशिनाथ भोईर, कोलाड ग्रुप अध्यक्ष संदेश लोखडे, सोनगांव ग्रुप अध्यक्ष खेळु ढमाल, मेढाग्रुप अध्यक्ष रामशेठ करंजे, ऐणघर ग्रुप अध्यक्ष यशवंत हळदे, सुतारवाडी ग्रुप ह.भ.प.पडवळ महाराज, देविदास सानप, दगडु बामुगडे, सतोष देवळे, सतोष भोईर, शशिकांत कडू, शंकर कदम, महेश भगत, सुनिल मोहिते, महेश तुपकर, सुशिल खांडेकर यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कुणबी समाज बांधव व आदी कार्यकरणी सभासद उपस्थित होते.
यावेळी कुणबी समाजातील युवा नेतृत्व महेशजी ठाकूर यांचा वाढदिवस 21सप्टेंबर ला आहे व त्या निमित्ताने रोहा तालुका कुणबी समाजातील सर्व ज्येष्ठ तालुका कमिटीचा शाळ, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वानी युवा नेतृत्व महेशजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्व रोहा तालुका कुणबी समाज्याच्या वतीने महेशजी ठाकूर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
तसेच सर्व जेष्ठ तालुका कमिटीचा सत्कार करण्याची संधी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्याबद्दल महेशजी ठाकूर यांनी आभार व्यक्त केले.