श्री क्षेत्रपाल मित्र मंडळ व लायन्स क्लब कोलाड यांच्या वतीने शालेय शैक्षणिक साहित्य वाटप 

कोलाड : प्रतिनिधी 

रोहा तालुक्यातील पुई येथील श्री क्षेत्रपाल मित्र मंडळ गेली पंधरा वर्षे सामाजिक बांधिलकी जपत समाजात विविध उपक्रम राबवत आहेत या गावात गेली पंधरा वर्षे मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साह वातावरणात, भक्तीभावाने व आगळ्या वेगळ्या पद्धतीने विविध उपक्रम सादर करत साजरा केला जात आहे याचं अनुषंगाने याहीवर्षी या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आशा स्तुत्य उपक्रमाचे या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

श्री क्षेत्रपाल मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व मूळ मार्गदर्शक अनंत सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा वर्षे अविरतपणे चालत आलेला गणेशोत्सव आणि या उत्सवाचे औचित्य साधून या प्रसंगी श्री क्षेत्रपाल मित्र मंडळ पुई यांच्या वतीने गावातील सर्व जेष्ठ नागरिकांचा सन्मान केला तसेच विविध उपक्रम राबविले त्याच बरोबर अधिक नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून यावर्षी श्री क्षेत्रपाल मित्र मंडल आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अंगणवाडी ,प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी मंडळाचे संस्थापक व मूळ मार्गदर्शक अनंत सानप, लायन्स क्लब कोलाड रोहा अध्यक्ष डॉ. सागर सानप, लायन दिनकर सानप, अध्यक्ष विठ्ठल पवार , सचिव हरीचंद्र कदम,  चंद्रकांत फाटे, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर दिसले, विठोबा सानप, सुभाष दिसले, राम बुवा आंबेकर, समीर पडवळ, अजित लहाने, धोंडू सानप, प्रभाकर चिनके, नरेश लहाने, श्रवण कदम, मंगेश सानप, करण सानप, केतन मोहिते,सागर दिवेकर, केतन मोहिते, हरिष महाडिक,इत्यादी मान्यवर व आदी मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी, गावातील विदयार्थी, ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाला उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन करत पुस्तकी ज्ञान अधिक मोलाचा आहे शिकाल तरच टिकाल इतर खेळांबरोबरच शिक्षणाला अधिक महत्व दिले पाहिजे. स्पर्ध्येच्या युगात इयत्ता दहावी बारावी नंतरच खरे शिक्षण घेतले पाहिजे त्यामुळे आपल्या जीवनाची प्रगती होईल भविष्यात चांगले शिक्षण घ्या आणि आयुष्यात खूप मोठे व्हा आपल्या गावचे व आई वडिलांचे नाव उज्वल करा असे मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सागर सानप यांनी तर आभार प्रदर्शन श्रवण कदम यांनी मानले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व श्री क्षेत्रपाल मित्र मंडळांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog