माणगांव येथील बेकायदा जुगार क्लब प्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश

रायगड : प्रतिनिधी

माणगांवमध्ये येथील बेकायदा जुगार क्लब विरोधात उच्चस्तरिय तक्रारी दाखल होऊ लागल्याने याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय - मुंबई येथून गृह विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.

माणगांव शहरात मुंबई-गोवा महामार्गावर वक्रतुंड हॉटेलच्या वर अवैध जुगार क्लब राजरोसपणे सुरु असून यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे तातडीने हा अवैध जुगार क्लब बंद करण्यात यावा अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे. याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश जारी करण्यात आल्यामुळे हा बेकायदा जुगार क्लबचा बाजार आता बंद होण्याच्या मार्गावर आलेला आहे. या क्लब विरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog