आधार क्रमांक जोडण्याकरिता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
मतदार यादीतील तपशीलाशी आधार क्रमांक जोडण्याकरिता दि.११ सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला शिहू सह चोळे, गांधे, मुंढाणी, तरशेत, जांभूळटेप येथिल नागरिकांचा उत्सपूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाणे मतदार यादीतील तपशीलासी आधार क्रमांक जोडण्यासाठी कार्यक्रम जाहीर केलेला असून या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्या बाबत सूचना दिल्या आहेत सदर उपक्रमांतर्गत दि.११ सप्टेंबर रोजी शिहू मतदान केंद्रावर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशांनुसार उपस्थित मतदारांकडून नमुना क्रमांक ६ ब चे अर्ज भरून घेण्यात आले.
Comments
Post a Comment