ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रायगड प्रीमियर लीग 2022 (लेदर क्रिकेट) टी - 20 स्पर्धेचे आयोजन

चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी

रायगड प्रीमियर लीग यांनी गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी टी - 20  स्पर्धेचे  आयोजन केले आहे गेल्या मोसमामातील स्पर्धेतील संघांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. ही स्पर्धा मॅटिंग व टर्फ विकेटवर खेळण्यात येणार आहे. 

या स्पर्धेसाठी व्यावसायिक पंच आणि गुणलेखकांच्या देखरेखीखाली असेल स्पर्धा ही सफेद चेंडूवर घेण्यात येणार आहे स्पर्धेतील सहभागी संघातील खेळाडूना आयोजकांतर्फे गणवेश देण्यात येईल स्पर्धा ही  १.१.१९९७  ते १.१.२००७  या वयोगटातील खेळाडूंसाठी असेल प्रत्येक संघात कमीत कमी 16 खेळाडू असतील खेळाडूची लिलाव प्रक्रियेत बोली लागेल त्याप्रमाणे स्पर्धेत सहभागी होईल आणि लिलाव प्रक्रियेमध्ये बोली न लागलेल्या खेळाडूंची बाद फेरीची टी-20 स्पर्धा खेळण्यात येणार. बाद  फेरीतील स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंसाठी मुख्य स्पर्धेतील संघामध्ये समावेश करण्यात येणार आहे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी अर्ज पुढील काही दिवसात ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. स्पर्धेतील खेळाडू .पंच गुणलेखक. हे रायगड जिल्ह्यातील असतील स्पर्धे करता रायगड जिल्ह्यातून खेळाडूंनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान रायगड प्रीमियर लीग समितीतर्फे करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog