स्वयंभू श्री धावीर महाराज यांचे मूळस्थान असलेल्या वराठी येथील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

रोहा : किरण मोरे

निकृष्ट दर्जात काम व त्यामुळे रस्त्यांची झालेली सध्याची स्थिती यामुळे वाहने चालवायचे म्हणजे मनात धडकीच भरते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्नच पडतो.

या धोकादायक परिस्थितीचा उलघडा करणेही फार कठीण झाले आहे. कारण मुख्य शहर असो किंवा गावा ठिकाण कोणत्याही अंतर्गत रस्त्यावर पाहिले तरी खड्डे पाठ सोडत नाहीत.

रोहा तालुक्यातील आराध्य दैवत  स्वयंभू  श्री धावीर महाराज यांचे  मूळस्थान असलेले गाव  वराठी येथिल रस्त्याची सुद्धा हीच अवस्था संपूर्ण रस्त्यांनी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे . रोहा मुरुड भालगाव मार्गे मुख्य असणारा हा रस्ता अक्षरशः प्रवाशांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. सर्वच प्रकारची मोठं मोठी वाहने या रस्त्यावरून वाहतूक चालू आहे. खड्ड्यानमधून निघालेली खडी यामुळे वाहने स्लिप होऊन किंवा खड्डे चुकवता चुकवता स्वतःचे जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे शिवाय डोंगर भागातील हा रस्त्या असल्याने अक्षरशः जीव मुठीत घेऊन लोक या रस्त्याने नेहमी प्रवास करत आहेत. आशा परिस्थिती मध्ये स्थानिक पुढाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अनेक वाहनांचे अपघात होने आशा गोष्टीना आमंत्रण हे खड्डे ठरू शकतात. कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी  लवकरात या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी वराठी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.

Comments

Popular posts from this blog