युनिकेम कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

रोहा : किरण मोरे

युनिकेम कंपनीच्या परिसराला प्रदूषणाचे ग्रहण लागलेले असून या कंपनीच्या प्रदूषणामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. ही भयानक समस्या असताना देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्प का आहे? असा प्रश्न येथील नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे.

युनिकेम कंपनीकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण सोडले जात असल्यामुळे नागरिकांचे जीवनमान धोक्यात आलेले आहे. या कंपनीतून वायू प्रदूषणाबरोबरच केमिकलयुक्त पाणी नदीत सोडले जात असल्यामुळे जल प्रदूषणाची समस्या देखील गंभीर बनत चालली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपनीविरूद्ध  प्रदूषणासंदर्भात कारवाई का केली जात नाही? प्रदूषण नियंत्रण मंडळ निष्क्रीय झालेय का? असे प्रश्न येथे उपस्थित होऊ लागले आहेत. परिणामी या कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात उच्चस्तरिय चौकशी होणे गरजेचे आहे.

Popular posts from this blog