तुषार लहानेचा दुर्दैवी मृत्यू जीवाला चटका लावून जाणारा!

कोलाड : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील मौजे पुगांव गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा कुटूंबात श्रीसदस्यांचा वारसा जोपासणारा शांत स्वभाव, शिक्षित, होतकरू, कर्तबगार तरुण जेष्ठ श्रेष्ठ नागरिकांचा आदर सन्मान राखणारा तुषार पांडुरंग लहाने याचा अल्पशा आजाराने दुर्दैवी अंत हा साऱ्यांच्या जीवाला चटका लावून जाणारा आहे .

आई वडिलांचा एकुलता एक तीन बहिणींचा लाडका भाऊ  वडिलांच्या पश्चात कुटूंबाची सारी जबादारी खांद्यावर घेत तसेच लहाने परिवारासह युवकांना हवाहवासा वाटणारा सर्वांच्याच हृदयात प्रेमाच घर निर्माण करणारा तुषार याचा अचानकपणे अल्पशा आजाराने त्याचे दुःखद निधन झाल्याने लहाने कुटुंबावर दुःखाचे डोंगर व परिसरात शोककळा पसरली आहे .

तुषार याच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य नातेवाईक व नागरिक तसेच समस्त पुगांव ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते व विविध असंख्य मान्यवरांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन पर भेट घेतली.त्यांच्या पश्चात दोन मुलगे कु.भाग्येश, आदेश, पत्नी व आई तसेच तीन बहिणी,असा मोठा लहाने परिवार आहे. कै. तुषार लहाने यांचे पुढील दशक्रिया विधी गुरुवार ११ ऑगस्ट २०२२ पुगाव येथील श्री क्षेत्र कमलेश्वर मंदिर शेजारील तळावावर होतील तर उत्तरकार्य विधी रविवार दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी यावेळी त्यांच्या पुगांव येथील निवासस्थानी होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog